आरोग्य सेवक पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती

मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

जिल्हा परिषदठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देऊन समुपदेशना नंतर पदस्थापना आदेशांचे वितरण दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, ‘अधिक जबाबदारीने सेवा करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम बनविण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे.

Scroll to Top