हाजुरी येथील ‘गुरूप्रेरणा’च्या ९० नागरिकांच्या घराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांचा पाठपुरावा

हाजुरी येथील गुरूप्रेरणा गृहनिर्माण संस्थेचा गृहनिर्माण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे १२० जणांना घरे मिळाली असून अद्याप २० नागरिकांना घरे मिळालेली नाही. या संदर्भात विकास रेपाळे आणि नम्रता भोसले-जाधव यांनी आज एसआरए अधिकाऱ्यांशी बैठक घेत चर्चा केल्याने या ९० नागरिकांच्या घराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

हाजुरी येथील गुरूप्रेरणा गृहनिर्माण संस्थेचा गृहनिर्माण प्रकल्प सुमारे १३ वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या पाठपुराव्याला यश मिळत असून पहिल्या टप्प्यात १२० नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली आहेत. मात्र, अद्याप सुमारे २० नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात नागरिक, विकासक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये प्रलंबित कामाचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विकासकाला येत्या तीन ते चार महिन्यांत उर्वरित नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांची उर्वरित भाड्याची रक्कम तातडीने अदा करण्याबाबत आणि सध्या नागरिक राहत असलेल्या इमारतींमधील पाणी, स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती व इतर मूलभूत समस्यांचे तातडीने निवारण करण्याबाबत सज्जड दम देण्यात आला. नागरिकांना वर्षानुवर्षे त्यांच्या हक्काच्या घरांसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आमचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि संघर्ष सुरूच राहणार आहे असे यावेळी नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी सांगितले.

Scroll to Top