सार्वजनिक गणपती महामंडळ, भिवंडी शहराच्या संपर्क प्रमुखपदी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वैभव अशोक महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
वैभव महाडिक हे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरातील गणेश मंडळे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे. या नियुक्तीबद्दल महाडिक यांचे विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अधिक संघटित आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


