‘लाडक्या बहिणीं’चा शहापूरात धडक मोर्चा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असूनही e-KYC, आधार लिंकिंग, बँक खाते व अन्य तांत्रिक अडचणींमुळे सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या आदिवासी, कातकरी तसेच गरीब महिलांच्या प्रश्नावर आता श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. प्रलंबित लाभ तात्काळ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी २७ ऑगस्ट २०२६ रोजी शहापूर येथील एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर ‘लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाची पूर्वसूचना देत श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या शहापूर तालुका महिला अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी वाघ व तालुका महिला सचिव श्रीमती दर्शना आगीवले यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Scroll to Top