कोशिंबी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न !

येथील कोशिंबी (ता. भिवंडी) या केंद्राची शिक्षण परिषद कांदळी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वातावरण संपन्न झाली.

सदर, परिषदेत सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून तसेच भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले तर शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पष्टे, सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत केले. यामध्ये सर्व शिक्षा अभियान विषय तज्ज्ञ शैलेंद्र पाटील यांनी निपूण महाराष्ट्र, निपूण भिवंडी या विषयावर विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन व शिक्षकांची भूमिका या विषयी अतिशय प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख पूजा परदेशी यांनी मित्र उपक्रमांतर्गत अनापानचे महत्त्व पटवून प्रात्यक्षिक करून घेतले. तर शिक्षक रविंद्र पोटे, तुकाराम आंगणे, शिक्षिका सविता ढमाळे, वैशाली बागुल यांनी प्रत्येक विषयाचे मुद्देसूद व सखोल मार्गदर्शन केले.

या शिक्षण परिषदेवेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाच्या माजी सभापती वैशाली चंदे, सरपंच नम्रता जाधव, केंद्रप्रमुख पूजा परदेशी, सर्व शिक्षा अभियान विषय तज्ज्ञ शैलेंद्र पाटील, केंद्रीय मुख्याध्यापिका गिता चासकर, पदवीधर शिक्षक शामराव पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूर्वा जाधव, शिक्षक मनोहर मडके आदी मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेचे प्रस्ताविक शाळेचे सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी आभारप्रदर्शन मुख्याध्यापक चंद्रशेखर ढेंगळे यांनी केले तसेच शाळेचे शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले तर शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शिक्षण परिषदेची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Scroll to Top