पर्यावरणपूरक-प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईतील नागरिक व मंडळांना आवाहन

आपले नवी मुंबई शहर शांतताप्रिय असून वावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरण शील व प्लास्टिकमुक्त साजरा करण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य भावनेने आपले योगदान द्यावे असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम सुजाता पाटील यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्याकरणपूरक देखावे करा, आरोग्य व संस्कृती संवर्तक उपक्रम राबडा आणि चांगल्या गोष्टींची जनजागृती करा असे आवाहन नवी मुंबईकर नागरिकांना केले

यावर्षी १४ सप्टेंबर पासून सर्वत्र गणेशोत्सव साध्जय होत असून या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका पोलीस व संबंधित प्राधिकरणे यांची श्रीगणेशोत्सव मंडळांसमवेत पूर्वतयारी नियोजन बैठक महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महापौर सुजाता पाटील पांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक विशाल विचारे, शहर अभियंता शिरीष आस्दवाड, परिमंडळ २ उपआयुता संजय शिंदे, उद्यान विभाग उप आयुक्त सिम्ता काले, घनकचरा व्यवस्थापन विभाग उप आयुक्त डी अजय गडदे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डी. राजेश म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, परिवहन व्यवस्थापक उमाकांत अंगले, अति. शहर अभियंता मदन वाघवौडे, सहा. पोलीस आयुक्त संदेश नाईक होणार नाही याचीही काळजी घ्यावी अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या. सध्या मोरचे धराण ९३ टक्के इतके भरलेले असून उत्साव काळात नागरिकांची विशेषत्वाने महिलांवी अडचण होऊ नये यादृष्टीने सध्या सुरू असलेली पाणीकपात गोकुळाष्टमीयासून रद्द करण्यात येत असल्याचेही महापौरांनी जाहीर केले. मात्र पाणीकपात रद्द केली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळाचा आणि काटकसरीने व जबाबदारीने पाण्याचा चापर करावा असे सूचित केले. गणेशोत्सच मंडळांनीही जल बचतीचा संदेश जास्तीत जास्त प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावा असेही आवाहन यावेळी महापौरांनी केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापौर गणेशदर्जन स्पर्धा २०२६ आयोजित करीत असून यावर्षी घरगुती गणेशोत्सवासाठीही विशेष कॅटेगरी ठेवण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले, त्याचप्रमाणे मूर्तीच्या उंचीवरून मंडळांमध्ये होणारी स्पर्धा टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृर्टीने ‘मूर्ती लहान पण भावना महान असे एक वैशिष्टयपूर्ण पारितोषिक या स्पचैतर्गत लहान मूर्ती आणणाऱ्या सार्वजनिक मंडळांसाठी देण्यात येईल असे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी मंडळांशी संवाद साधताना गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक्त परवानग्यांकरिता एक खिडकी योजना करण्यात आली असून त्याचा जास्तीत जास्त लाभघ्यावा असे आवाहन केले.

Scroll to Top