भिवंडीतील नदी नाका-पारोळ मार्गाची दुरावस्था रस्ता खचल्याने अपघाताचा धोका

भिवंडीतील नदी नाका-पारोळ मार्गाची दुरावस्था रस्ता खचल्याने अपघाताचा धोका

शहरालगतच्या शेलार नदीनाका-पारोळ मार्गावरील सिमेंटकाँक्रीटचा रस्ता खचल्याने या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्ता खचून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी संबंधित बांधकाम विभागाकडून अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्ता खचलेल्या ठिकाणी सध्या टोपली आणि बांबूच्या काठीचा आधार देऊन परिस्थिती हाताळण्यात आली आहे. मात्र, हा तात्पुरता उपाय वाहनचालक -आणि पादचा-यांसाठी-धोकादायक ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या
-ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था किंवा स्पष्ट सूचना फलक नसल्याने अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.
खचलेल्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कपड्यांवर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतरचे गरम पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना एखाद्या नागरिकाचा किंवा विद्यार्थ्यांचा तोल जाऊन नाल्यात पडल्यास भाजणे अथवा गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिकांची कामगार आणि ये-जा सुरू असते. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यास खचलेला भाग लक्षात येत नसल्याने धोका आणखी वाढतो. त्यामुळे तात्पुरत्या टोपली-बांबूच्या आधारावर रस्ता सुरू ठेवण्याऐवजी संबंधित बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच नाल्यात सोडल्या जाणाऱ्या गरम व रासायनिक पाण्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Scroll to Top