खर्डी येथील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाचा गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया ‘च्या जयघोषात भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जन सोहळ्यात सोसायटीतील महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उत्सवाच्या निमित्ताने सोसायटी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अध्यक्ष दिपेश म्हात्रे, उपाध्यक्ष गणेश चिलवेरी, सचिव गौतम कदम, उपसचिव संदीप कोकणे, खजिनदार रितेश मिश्रा, ऑडिटर मोहन मांडवकर, राहुल शर्मा, संजीव नारायणकर तसेच समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
खर्डीतील साई सृष्टी हेरिटेजचा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न



