वाढदिवस साजरा न करता नगरसेवक भरत चव्हाण यांची दुष्काळग्रस्तांना मदत

वाढदिवस साजरा न करता नगरसेवक भरत चव्हाण यांची दुष्काळग्रस्तांना मदत

राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी मदतीचा धनादेश प्रदान केला. राज्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाच्या संकटात आम्ही कायम दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी राहू. तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थानीही दुष्काळग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांनी केले आहे.
माथाडी चळवळीचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने वाशी येथे शुक्रवारी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अल निनो’ च्या प्रभावामुळे राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पावसाची तूट निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्येच राज्यावर दुष्काळाची छाया आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री सहायता निर्धाला धनादेश देण्यात आला आहे.

Scroll to Top