ऐरोली विभाग कार्यालयामार्फत सलग 3 दिवस अनधिकृत बांधकामविरोधी धडक मोहीमा

3 दिवस अनधिकृत बांधकामविरोधी धडक मोहीमा

महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीमा सर्वच विभाग कार्यालयांमार्फत तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. यामध्ये नोटीस देऊनही नोटीशीची दखल न घेणा-या अनधिकृत बांधकामांवर जी विभाग ऐरोली कार्यालयाच्या वतीने धडकपणे तोडक कारवाया सलग 3 दिवस करण्यात आल्या.
यामध्ये (1) काशिनाथ मतभिक यादव, एस. आर. वर्मा-विकासक (2) काशिनाथ मतभिक यादव यांनी घर क्र- H-106, से-4, ऐरोली आणि घर क्र- H-107, से-4, ऐरोली, नवी मुंबई येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या दोन्ही अनधिकृत बांधकामांस जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये दि. 21/01/2026 रोजी नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण उपआयुक्त श्री. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखील ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. विशाल शितोळे यांच्या नियंत्रणाखाली 29 सप्टेंबर रोजी तोडक कारवाई करण्यात आली व सदर अनधिकृत बांधकामे अंशतः निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी जी विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, 14 मजूर, 4 ब्रेकर, 4 घण, 2 जनरेटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.

Scroll to Top