विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला भिवंडी तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जमिनीच्या बदल्यात शासनाकडून अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याचा आरोप करत योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी स्थानिक भूमिपुत्रांच्या या रस्ता रोको आंदोलनात खारबाव सरपंच महेंद्र पाटील, वसंत पाटील, सुमित सुरेश म्हात्रे, हर्षल पाटील, दिपाली काटे, मनोज म्हात्रे, बाळा पाटील, अशोक पालकर, रमेश कारभारी, सुनील चव्हाण यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ भूमिपुत्र स्त्रीपुरुष सहभागी झाले होते.
या कॉरिडॉरची मार्गिका गेल्यानंतर पलीकडे असलेल्या शेतीकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही रस्ता उपलब्ध राहणार नसल्याचा गंभीर प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. या मागण्यांसाठी स्थानिक भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने भिवंडी वसई मार्गावर खारबाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. भिवंडी वसई महामार्गावर दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विरार-अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको



