राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठाणे काँग्रेस आक्रमक; केंद्राविरोधात ‘रास्ता रोको’

केंद्राविरोधात 'रास्ता रोको'

लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर घेत ठाणे काँग्रेसने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला. राहुल गांधींवरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन करत काँग्रेसने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवून निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. ठाणे शहर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष राहुल कारभारी पिंगळे यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक व्यवस्थेबाबत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली.
७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच ‘INDIA’ आघाडीच्या खासदारांवर पोलिसी बळाचा वापर करून दडपशाही केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा ठाणे काँग्रेसने तीव्र निषेध केला.

Scroll to Top