एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला निरंजन डावखरेंची भेट

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला निरंजन डावखरेंची भेट

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील
शास्त्री पेठ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांचे भवितव्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झाली आहे. विद्यार्थ्यांची फी माफी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील प्रश्नांसह सुमारे २० ते २२ मागण्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे डावखरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासन संवेदनशीलतेने पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा हा घटनात्मक पदाशी संबंधित असल्याने त्याबाबत निश्चित कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे आंदोलन केवळ या एका मागणीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांची फी माफी, परीक्षा पद्धती, मार्किंग आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे डावखरे यांनी सांगितले.

Scroll to Top