निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. भिवंडीत इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवारी पोलिसांनी मोर्चा काढण्याची परवानगी नाकारल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने करीत निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
इंडिया आघाडीतील काँग्रेस शहराध्यक्ष अबिद खान, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, समाजवादी पार्टी शहराध्यक्ष रियाज आजमी, शिवसेना (उ.बा. ठा.) संपर्क संघटक मनोज गगे, कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनात आमदार रईस शेख, उपमहापौर तारीक मोमिन, असंख्य नगरसेवक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवडणूक प्रक्रियेमध्ये कधी नव्हे तेवढा गोंधळ निवडणूक आयोगाने घालून ठेवला आहे. ज्यामुळे देशातील व्होट चोरीचा फायदा घेऊन भाजपा सत्ता उपभोगत आहे. ज्यामुळे लोकशाही व देशाचे संविधान धोक्यात आले असून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
व्होट चोरीविरोधात भिवंडीत इंडिया आघाडी तर्फे उग्र निदर्शने



