नाशिक – येथील ४ थ्या नाशिक राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ‘ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स क्लब’ च्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी ‘सर्वसाधारण सांघिक विजेतेपद’ (Overall Team Championship) पटकावले.
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे २००० खेळाडूंच्या स्पर्धेत या क्लबच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. हे घवघवीत यश क्लबचे मुख्य प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक स्वप्नील चव्हाण, पराग मोकल आणि देसाई मॅडम यांच्या अथक परिश्रमांमुळे साध्य झाले आहे. या स्पर्धेत क्लबच्या चार खेळाडूंनी ‘वैयक्तिक अजिंक्यपद’ (Individual Championship) मिळवून क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामध्ये जिहांश सुमित पाटील (३ सुवर्ण), अनुष्का माझी (२ सुवर्ण, १ रौप्य), इरा योगेश कवडे (२ सुवर्ण) आणि जियांश संदेश पाटील (१ सुवर्ण, १ रौप्य) यांचा समावेश आहे
.विजेत्या खेळाडूंची कामगिरी खालीलप्रमाणे: जिहांश सुमित पाटील: लांब उडी, ६० मी. व १०० मी. धावण्यात ३ सुवर्णपदके (वैयक्तिक अजिंक्यपद).अनुष्का माझी: ८० मी. हर्डल्स व ४०० मी. मध्ये सुवर्ण, तर लांब उडीत रौप्यपदक (वैयक्तिक अजिंक्यपद). इरा योगेश कवडे: लांब उडी व ५० मी. धावण्यात २ सुवर्णपदके (वैयक्तिक अजिंक्यपद). जियांश संदेश पाटील: लांब उडीत सुवर्ण व ५० मी. मध्ये रौप्यपदक (वैयक्तिक अजिंक्यपद). स्वानंदी पै: लांब उडीत सुवर्ण व १०० मी. मध्ये रौप्यपदक. रुतुजा भालचंद्र पाटेरे: २००, ४०० व ८०० मी. धावण्यात ३ रौप्यपदके. आर्वी पराग मोकल: लांब उडी व ५० मी. मध्ये २ रौप्यपदके. अमित यादव व स्वरा नाईक: प्रत्येकी १ रौप्य व १ कांस्यपदक.गिहान अमित गाला: ४० मी. धावण्यात सुवर्णपदक. सार्थक चौधरी, आरोही नलावडे, श्रवण दळवी व दिती पारकर: यांनी कांस्यपदके पटकावली.
रिले (Relay) स्पर्धेतही क्लबच्या संघाने सुवर्ण कामगिरी केली. यामध्ये सनव वाझे, राजनंदिनी चौगुले, आयरा यादव, जैन खान, दक्ष महाराणा, सहज राठोड, त्रिशा गाला, आदित्य गांधी, देव पोल, दीक्षिता महाराणा, द्विती कोळी, वृशिन कांचन, युवान भारद्वाज, जीतराज चौगुले, अन्वी पाटील, एबी जीस आणि ओम बिंद या खेळाडूंचा समावेश होता. या नेत्रदीपक यशाबद्दल क्लबचे मुख्य प्रशिक्षक दत्ता चव्हाण आणि सर्व सहकाऱ्यांचे तसेच खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



