केडीएमटी चालकाने पटकावले शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक

screenshot 1

राष्ट्रीय स्वास्थ्य आणि शरीर सौष्ठव महासंघ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने रत्नागिरी येथे आयोजित ७२ वी राष्ट्रीय फिटनेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिनांक १मे आणि २ मे रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातर्फे चालक वासुदेव भंडारी यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकाविले आहे वासुदेव भंडारी यांनी परिवहन उपक्रमाचे व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नाव देशभरात लौकीक केल्याबद्दल त्यांचे सर्व परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याची माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top