ठाणे पूर्व सॅटीस पुलाच्या कामाची पाहणी
सॅटीस पुलाच्या कामामुळे सातत्याने ठाणे पूर्व भागात होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत
चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सॅटीस प्रकल्पातील कामामुळे होणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठिकठिकाणी पाहणी करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी सूचना दिल्या. त्यावेळी येत्या ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे पूर्व भागात वाहतूककोंडीची समस्या होणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ठाणे पूर्व भागात सॅटीस प्रकल्प सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



