१० कोटींच्या रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभारंभ
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी चालना मिळत असून मासले-बेलपाडा परिसरातील महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. केंद्र शासनाच्या माध्यमातून या रस्ते प्रकल्पासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे. “पोटगाव-सावरीपाडा-पिंपळोली-चरगाव-कारव-वांगणी” या प्रजिमा ८४ मार्गावरील किमी ०/००० ते २१/१०० या टप्प्यातील रस्त्याच्या सुधारणा कामांना शासन निर्णय क्र. के.मा.नि.२०२५/सी.आर.३०१/नि-३, दिनांक ३० डिसेंबर २०२५ अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तांत्रिक मान्यता रु. ९ कोटी २७ लाख ६२ हजार ४९० इतकी देण्यात आली आहे. सदर कामाचा करारनामा क्रमांक B1/CE/72 For 2026-2027 असून कार्यादेश ५ मे २०२६ मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी चालना मिळत असून मासले-बेलपाडा परिसरातील महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. केंद्र शासनाच्या माध्यमातून या रस्ते प्रकल्पासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे.
“पोटगाव-सावरीपाडा-पिंपळोली-चरगाव-कारव-वांगणी” या प्रजिमा ८४ मार्गावरील किमी ०/००० ते २१/१०० या टप्प्यातील रस्त्याच्या सुधारणा कामांना शासन निर्णय क्र. के.मा.नि.२०२५/सी.आर.३०१/नि-३, दिनांक ३० डिसेंबर २०२५ अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तांत्रिक मान्यता रु. ९ कोटी २७ लाख ६२ हजार ४९० इतकी देण्यात आली आहे. सदर कामाचा करारनामा क्रमांक B1/CE/72 For 2026-2027 असून कार्यादेश ५ मे २०२६ गावामध्ये ५०० मीटर आर.सी.सी. गटर बांधकाम आणि कारव स्मशानभूमीजवळ २४ २ मीटरचा बॉक्स कल्व्हर्ट उभारण्यात येणार आहे. यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे.
मासले-बेलपाडा गावातील तलावासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “तालुक्यात सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू असून अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी ग्रामीण भागातील काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे गावागावांतील संपर्क व्यवस्था मजबूत होत असल्याचे सांगितले. निधी वेळेवर उपलब्ध नसतानाही कामे पूर्ण करणाऱ्या मे. शिवकृपा डेव्हलपर्सचे अतुल भोयर यांचे आमदार किसन कथोरे देखील कौतुक केले.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ दळवी, मुरबाड तालुका भाजपा अध्यक्ष दीपक पवार, जितेंद्र भावार्थे जिल्हा परिषद च्या माजी सदस्य प्राजक्ताताई भावार्थे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, समाजसेवक मोहन भावार्थे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत बोस्टे, कराळे सर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पोगेरे, जिजाऊ संघटनेचे सज्जन जमढेरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कोरडे उल्हासनगरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


