वाढत्या महागाईच्याविरोधात शिवसेनेचे (उबाठा) आंदोलन

ठाणे – देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात आज शिवसेना (उद्धब बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. 


यावेळी संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, पदाधिकारी प्रतिक राणे, हेमचंद्र राठिवडेकर, अमोल हिंगे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, सुनंदा देशपांडे, राम काळे, राजेंद्र महाडिक, प्रदीप वाघ आणि शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top