दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी च्या उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा सत्कार

दहावी उत्तीर्ण झालेल्या विध्यर्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम, शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता, या वेळी खारीगांव येथील दहावी उत्तीर्ण झालेला मुलामुलींचा सत्कार कला संस्कृती प्रतिष्ठानच्या संचालिका सौ रचना राकेश पाटील आणि राकेश पाटील यांच्या हस्ते करण्यात त्याप्रसंगी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार विवेकानंद क्लासेस संस्थापक राजेश मिश्रा गणेश परब मोरेश्वर पवार अशोक शिरसाट कृणाल म्हात्रे व पालक वर्ग उपस्थित होते, यावेळी बोलताना रचना पाटील म्हणाल्या भविष्यात मुलांनी काय कराव कुठल्या शाखे कडे जावे या साठी आम्ही शिबीर भरवतो जेणे करन मुलांना त्यांची पुढची दिशा ठरवता येईल, तसेच यूपीएस एम पी एस मार्गदर्शन व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते त्यामुळे एक चांगले व्यक्तिमत्व विदयार्थ्यांच्या शिक्षणातून घडावे, हा त्या मागचा उद्देश असतो, हे तंत्रज्ञानाचे जग आहे देश झापाट्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत एआय चे महत्व वाढत चालले आहे तेव्हा विदयार्थ्यांनी त्याच प्रमाणे आपली प्रगती केली पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top