अकाली जन्मलेल्या बालकांची दृष्टी वाचवण्यात ठाणे सिव्हिल अव्वल

गेल्या वर्षभरात १००० ROP तपासण्या; १० बालकांवर यशस्वी उपचार, राज्यात ठाणे प्रथम

अकाली जन्मलेल्या व कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका निर्माण करणाऱ्या “Retinopathy of Prematurity (ROP)” या गंभीर आजाराच्या तपासणी व उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बाल नेत्र विभागात गेल्या वर्षभरात रुग्णालयात तब्बल १००० बालकांची ROP तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १० बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. राज्यात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे

ROP हा आजार प्रामुख्याने अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. वेळेत निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येऊ शकते. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नेत्र चिकित्सा विभाग कार्यरत असून, या ठिकाणी बालकांची नियमित डोळ्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नेत्र शल्य चिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार NICU/SNCU मध्ये उपचार घेणाऱ्या बालकांची विशेष तपासणी केली जाते. आधुनिक Retinal Camera च्या माध्यमातून बाळांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने उपचार केले जात आहेत. या उपक्रमामुळे अनेक बालकांची दृष्टी वाचण्यास मदत झाली असून, पालकांमध्येही जागरूकता वाढली आहे. यासाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर, डॉ. राहुल गुख, परिसेविका अस्मिता कदम, शीतल जठार, नीलम निकाळजे, किर्ती बोराडे आदी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top