शहापूरः शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या खरपत गाव हद्दीतील शाई नदी किनारी व मालद कांबा गाव हद्दीतील शाही नदी किनारी असणाऱ्या झाडा झुडपात गुरुवारी 4 जूनला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास किन्हवली पोलिसांनी छापा टाकून दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
किन्हवली परिसरातील खरपत व मालद – कांबा गाव हद्दीत शाई – नदी किनारी असलेल्या जंगलातील – झाडा झुडपात मोठ्या प्रमाणात – गावठी हातभट्टीची दारू तयार करणे व विक्री करण्याचा चोरटा धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नितीन खैरनार यांनी पोलीस हवालदार अरुण यशवंतराव, पोलिस नाईक सतीश शेळवले, गवारी, शिंपी यांचे पथक तयार करून गुरुवारी सायंकाळी 6 वाजता येथे छापा टाकून सुरू असलेले दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी पोलिसांनी प्लास्टिकचे ड्रम व त्यात असलेले दारू बनविण्यासाठी लागणारे द्रावण (वॉश) वाहतुकीस अवजड असल्याने जागीच नष्ट केले असून गावठी हातभट्टीची दारू बनविणा-या संबंधित आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (एफ) (ई) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.


