राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत वसई-विरारमधील खेळाडूंची चमकदार कामगिरी

ओडिशा येथील खुर्दा येथील बरुणेई टेम्पल रोडवरील के टी ग्लोबल स्कूल, के टी कॅम्पस येथे ३० मे ते ३ जून या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय ज्युनिअर किकबॉक्सिंग स्पर्धेत वसई-विरारमधील ३ खेळाडूंनी तब्बल ५ पदके पटकावत नेत्रदीपक कामगिरी पार पाडली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत संपूर्ण भारतातून ११४० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत वसईच्या ३ खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.
खेळाडूचे नाव व मिळालेली पदके : १. शौर्य मुंडापात २ सुवर्ण आणि १ कांस्य पदक, २. अंश मौ. २ रौप्य पदक, ३. ओम डेरे उत्कृष्ट खेळ, मात्र दुर्दैवाने उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.

स्पर्धेतील बहुतांश खेळाडूंना प्रशिक्षक सूर्यप्रकाश मुंडापात आणि अक्षय वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळाले आहे. याशिवाय, आतापर्यंत चीफ रेफ्री (मुख्य पंच) म्हणून आपली भूमिका चोख बजावणारे सूर्यप्रकाश मुंडापात सर यांची आता व्हाईस कमिटी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Scroll to Top