कल्याण – नुकत्याच पार पडलेल्या 9 व्या मुंबई विभागीय ‘कल्याण ट्रॉफी’ स्केटिंग स्पर्धेमध्ये मीरा-भाईंदरच्या संतोष स्केटिंग अकॅडमी ने ६५ गुणासह स्पर्धेचे अंतिम विजेतेपद तर कल्याणच्या सागर स्केटिंग अकॅडमी ने ५० गुणासह उपविजेतेपद पटकावले. उल्हासनगरच्या मोहित स्केटिंग अकॅडमी ने ३० गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका, स्पोर्ट्स केयर फाउंडेशन आणि रिजन्सी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील 240 खेळाडू सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत कियान पटेल, मैराह खोत, ध्रुविका रावराणे, आरव सिंग, जियाना शेट्टी, दियान पुजारी, रोशन कोसंबिया, वेदांत शिंदे, निर्वी लबधे, शौर्य गोहिल, इनाया शोएब, अलिश्बा शेख आलिया भाटी, लॉर्ना मिरांडा, इनाया शोएब, लविशा बिश्नोई, शिवांश बिश्नोई या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. तर हीत राठोड, रोनक कोसंबिया, आरोही शिवळकर, मालविका बाईंग, कृषय रावराणे, अगस्त्य पाठक, झैन काझी या खेळाडूंनी रौप्यपदक पटकावले.


