शिवड़ी येथे २३४ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

कल्याण – मानवतेच्या सेवेप्रति आपली बांधिलकी आणखी मजबूत करत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी प्रबोधनकार ठाकरे म्युनिसिपल स्कूल, शिवड़ी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवड़ी व आसपासच्या परिसरातील निरंकारी भक्तांनी यामध्ये उत्साहाने भाग घेतला आणि एकंदर २३४ युनिट रक्तदान करण्यात आले. संत निरंकारी ब्लड बैंक, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले.

या शिबिराचा शुभारंभ निरंकार परमात्म्याच्या प्रार्थनेने रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत होळकर यांच्या उपस्थितिमध्ये करण्यात आला. या प्रसंगी  सेवादलाचे क्षेत्रीय संचालक शंकर सोनवणे, संयोजक केशव पवार यांच्यासह अनेक शाखांचे प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. या शिबिराला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये प्रामुख्याने शिवड़ीचे नगर सेवक सचिन पडवळ व लालबागचे नगरसेवक किरण तावडे यांचा समावेश होता. मान्यवरांनी मिशनकडून मानवतेच्या कल्याणार्थ केल्या जाणाऱ्या निष्काम सेवांची स्तुती केली.

स्थानीक मुखी मोहन धुरी यांच्या देखरेखीखाली सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने या रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. अशा प्रकारच्या मानवीय प्रयत्नांच्या माध्यमातून संत निरंकारी मिशन निश्चितपणे हा संदेश देत आहे, की रक्तदान के केवळ सामाजिक दायित्वच नाही तर नि:स्वार्थ भक्तीची अशी अभिव्यक्ती आहे जी कित्येक जनसामान्यांना जीवनदान प्रदान करण्याचे माध्यम बनत आहे.

Scroll to Top