कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेविका अपर्णा संतोष भोईर यांची कन्या श्रुती भोईर हिने चार्टर्ड अकाउंटंट ही अत्यंत प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रुतीच्या या यशामुळे भोईर कुटुंबासह कल्याण-डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश मिळवले असून तिच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चार्टर्ड अकाउंटंट ही देशातील सर्वात कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. अशा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून श्रुतीने इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल श्रुती भोईर हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


