महापौरांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मिरा-भाईंदर महापालिका महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता
यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका परिवहन उपक्रमासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक 3:जित करण्यात आली. शहरातील सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम, नागरिकाभिमुख व गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, परिवहन समिती सभापती राजकुमार मिश्रा, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (परिवहन) प्रणाली घोंगे तसेच सहाय्यक आयुक्त (परिवहन) दिनेश कानगुडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन उपक्रमाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. विशेषतः महिलाप्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने भाऊबीज, रक्षाबंधन तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर यांनी दिल्या.

तसेच शहरातील विद्यमान बसथांबे व बस शेल्टर यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी सर्वंकष सर्वेक्षण
करण्याच्या सचना देण्यात आल्या नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर व सुसज्ज प्रतीक्षा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही यावेळी निर्देश देण्यात आले.
परिवहन उपक्रम अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महसूलवाढीच्या विविध पर्यायांचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर करून परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. यावेळी महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी नागरिकांना वेळेवर, सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिकत असल्याचे नमूद केले. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक कार्यक्षम व नागरिकाभिमुख करण्यासाठी सातत्याने – प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना अधिक – गुणवत्तापूर्ण परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन उपक्रमामार्फत विविध सुधारणा आणि सुविधा टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Scroll to Top