जळगाव येथे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत टिटवाळा बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेत सुवर्णपदक तसेच कब वर्ग मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट बॉक्सर पुरस्कार माधव रेवतकर, रौप्यपदक परी सिंग, अर्जुन गायकवाड, कांस्यपदक आस्था नाईक, गिरीश बागड, अर्जुन रेवतकर, तसेच नीरजा गोर्डे व रागिणी गवळे यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत चांगली लढत दिली. संघाचे प्रशिक्षक लक्ष्मी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना गेल्या काही वर्षांपासून टिटवाळा बॉक्सिंग क्लबचे मुख्य प्रशिक्षक संतोष मुंढे यांचे प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि मार्गदर्शनाचे हे यश मानले जात आहे.


