क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी-महापौर नारायण चौधरी

भिवंडी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वप्रथम प्राधान्य देण्याची गरज असून त्यावर शाळा व्यवस्थापन, वाहतूक पोलिस व वाहतूक करणारे बस चालक यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन भिवंडी महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी केले आहे. ते शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांच्या बेशिस्तिमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने, त्यावर चर्चा करून मार्ग काढण्याच्या उद्देशाने शुक्रवारी आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी शाळेचे संस्थाचालक, वाहतूक पोलीस, मनपा अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थी हे भिवंडीचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शहराचा प्रथम नागरिक या नात्याने माझी आहे असे सांगत सर्व संबंधितना शाळा भरताना व सुटताना किमान दोन शाळेचे कर्मचारी विद्यार्थ्यांच्या वाहतुकी वर नियंत्रण करणे कामी उपलब्ध ठेवावे, शाळा प्रशासनाकडून भिवंडी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वप्रथम प्राधान्य देण्याची गरज असून त्यावर शाळा व्यवस्थापन, वाहतूक पोलिस व वाहतूक करणारे बस चालक यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन भिवंडी महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी केले आहे. ते शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांच्या बेशिस्तिमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने, त्यावर चर्चा करून मार्ग काढण्याच्या उद्देशाने शुक्रवारी आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी शाळेचे संस्थाचालक, वाहतूक पोलीस, मनपा अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थी हे भिवंडीचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शहराचा प्रथम नागरिक या नात्याने माझी आहे असे सांगत सर्व संबंधितना शाळा भरताना व सुटताना किमान दोन शाळेचे कर्मचारी विद्यार्थ्यांच्या वाहतुकी वर नियंत्रण करणे कामी उपलब्ध ठेवावे, शाळा प्रशासनाकडून शासन गृह विभागाचा सन २०११ ची स्कूल बस करीताच्या अधिसूचनेनुसार विद्यार्थी हा शाळेत आल्यापासून त्याच्या घरी पोहोचेपर्यंतची जबाबदारी ही शाळांची असते असे नमूद करीत, शाळा व्यवस्थापनांना अधिसूचनेचे काटेकोर पणे पालन करावे अशा सक्त सूचना वजा आवाहन केले तसेच, कोणताही खाजगी वाहनचालक हा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या वाहनात बसवणार नाही याची दररोज पडताळणी वाहतूक पोलिसांनी करावी, तसे कोणी करत असल्याचे आढळल्यास त्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश देखील महापौर नारायण चौधरी यांनी दिले आहेत.

Scroll to Top