अंबरनाथमधील अटल उद्यानात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास !

मुलं, महिला, जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आयोजित तसेच जीबीके ग्रुप आणि कीडा भारती, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्योदय सोसायटी मधील ‘अटल उद्यान’ येथे भाजपा नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करेजुले-पाटील, व भाजपा गटनेते अभिजीत करंजुले-पाटील आयोजित भव्य सामूहिक योगाभ्यास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमामध्ये योगाचार्य तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष दिनेश सिंग यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योगामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याबरोबरच मानसिक स्थैर्य, सकारात्मक विचारसरणी आणि संतुलित जीवनशैली विकसित होते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. नियमित योगाभ्यास हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले.

योग एक संपूर्ण जीवनशैली-भाजपा नगराध्यक्ष – तेजश्री करंजुले- पाटील
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आयोजित जीबीके ग्रुप च क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथच्या अटल उद्यानात सामूहिक योगाभ्यास शिबिराला अंबरनाथकरांचा खूप चांगला मिळाला. नियमित योगाभ्यासाने शरीर सुदृद्ध निरोगी राहते आणि मनाला शांती मिळते. आयुमान वाढते, त्यामुळे सर्वांनीच योगा केला पाहिजे, असे आवाहन भाजपा नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील यांनी यावेळी केले. २०१० च्या आधी फक्त लोकांना रामदेव माहीत होते, थोडा फार लोकांना योगा काय असतो याची माहिती होती. परंतु आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योगाला खेळाचा दर्जा देऊन, आज योगाचा सम्मान वाढवलेला आहे. त्यामुळे आज संपूर्ण भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये योगाचा प्रसार झालेला आहे. आणि मला वाटतं योगा हा लवकरच ऑलिम्पिकमध्ये सुद्धा येईल, अशी मी अपेक्षा करतो. मोदीजींनी या योगाला प्राधान्य दिलं आणि त्यांच्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसाप्त झाला. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. मोदीजींचे एकच ध्येय आहे की, भी आणि आणि माझी प्रजा सुदृढ आणि निरोगी रहावी, हाथ उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे.

Scroll to Top