भिवंडीत वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची निदर्शने

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार व शैक्षणिक फसवणूक विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय कार्यालया समोर जोरदार निदर्शनाकडून केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा निषेध नोंदवला आहे.

निवेदन उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व केंद्रीय अर्थमंत्री यांना देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा च्या कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत निघालेल्या या मोर्चात शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू हे सायकलवर स्वार होऊन सहभागी झाले होते. त्यासोबत नगरसेवक फराज बाहुद्दीन, माजी नगरसेवक इम्रान खान, हलीम अन्सारी, अर्शद अन्सारी, डॉ. तालीश मोमिन, सुरेंद्र मुळे, सुरेश पाटील, मुमताज अन्सारी, तुफेल फारूखी, हारून खान, महिला अध्यक्षा स्वाती कांबळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

Scroll to Top