ठाणे पाणीपुरवठा, निधी व पारदर्शकता पारदर्शकता असेल तर हिशेब देण्यास अडचण नसावी-आमदार संजय केळकर…

विविध कर भरूनही ठाणेकर टँकरवर आमदार संजय केळकर यांचा जन आंदोलनाचा इशारा

अमृत २.० अंतर्गत सुमारे १,७५०.८२ कोटींच्या प्रकल्पांचा समावेश असून एवढा निधी उपलब्ध असताना ठाणेकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. विविध कर भरूनही त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासंदर्भातील योजनांच्या निधीचा हिशेब, मोठ्या निविदांचे स्वतंत्र लेखापरीक्षण याबाबत कालबद्ध कृती आराखडा तातडीने जाहीर करावा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्रकार परिषदेत दिला.

आज भाजपा ठाणे शहरतर्फे ठाणे शहरातील पाणीपुरवठा, टैंकर व्यवस्था, स्मार्ट मीटरिंग, अमृत निधी आणि ठाणे महानगरपालिकेतील निविदा पारदर्शकता या गंभीर नागरी विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर, विधान परिषद सदस्य अॅड निरंजन डावखरे आणि विधान परिषद सदस्या अॅड. माधवी नाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या पाणी व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. ठाणेकर नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विकास शुल्क भरत असतानाही अनेक भागांत नियमित व

विश्वासार्ह पाणीपुरवठा होत नाही. अनेक नागरिक आणि गृहनिर्माण संस्था आजही टँकरवर अवलंबून आहेत. ठाणे शहरात सहा लाखांपेक्षा अधिक घरे वा मालमत्ता असल्याचा मुद्दा समोर येत असताना स्मार्ट आणि एएमआर मीटरिंग सुमारे एक लाखाच्या आसपासच असल्याचे दिसते. त्यामुळे पाणी किती सोडले, किती बिल झाले, किती वसूलझाले आणि किती पाणी बिनहिशेबी गेले, याचा स्पष्ट हिशेब नागरिकांसमोर येणे आवश्यक असल्याचे मत पत्रकार परिषदेत मांडण्यात आले.
अमृत २.० अंतर्गत ठाणे शहरासाठी पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सांडपाणी प्रक्रिया आणि जल व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधी दाखविण्यात आला आहे. उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार अमृत २.० अंतर्गत सुमारे १,७५०८२ कोटींच्या प्रकल्पांचा संदर्भसमोर येतो. एवढा निधी उपलब्ध असताना (तर अमृत 1.0 मधील ओळखलेल्या केंद्रीय वाट्यासह एकत्रित सार्वजनिक रक्कम सुमारे 1,819.07 कोटीच्या आसपास असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला) ठाणेकरांच्या नळात प्रत्यक्ष सुधारणा का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Scroll to Top