भिवंडीत नाल्यातील कचरा न काढता पुढे ढकलण्यासाठी कामगारांची कसरत, व्हिडिओ व्हायरल

भिवंडी शहरातील आणि सफाई नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. कोट्याद्री खर्च करू नये व्यवस्थित नालेसफाई न झाल्याने पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार समोर येत असतात. प्रशासकीय राजवटीनंतर नगरसेवक निवडून आले आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात यंदाची नालेसफाई ही मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झाली. पाऊस लांबलेल्याने या कालावधीत नालेसफाई होणे गरजेची होती. परंतु या वाढीव काळात ही नालेसफाई पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थिती मध्ये नाल्यातील कचरा आणि गाळ काढण्याची तसदी न घेता तो पुढे ढकलून देण्यात नालेसफाई करणारे कामगार धन्यता मानत आहेत असा एक व्हिडिओ नुकताच भिवंडी शहरात समाज माध्यमां वर व्हायरल झाला आहे. शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील आमपाडा परिसरातील हा नाला असून या नाल्यां मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा अडकून पडलेला आहे. असे असताना हा गाळ आणि कचरा बाहेर काढणे गरजेचे आहे. परंतु त्या ठिकाणी नाले सफाई चे काम करणारे कामगार हा कचरा जोर लावून पुढे ढकलत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी फैजल तातली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो न झाल्याने पालिका प्रशासनाची भूमिका समजू शकली नाही.

Scroll to Top