नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी गटारे उघडी असून त्यावर कोणत्याही प्रकारची झाकणे नसल्याने रस्ता आणि गटार यामधील फरकच ओळखता येत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
पडघा परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला तसेच पडघा परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला तसेच आलेल्या कंपाउंडच्या पत्र्यांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून काही ठिकाणी पत्रे वाकलेली आहेत. जोरदार वारा किंवा पावसामुळे हे पत्रे कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने या धोकादायक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


