समन्वय प्रतिष्ठानतर्फे मुरबाड येथिल जंगल परीसरात बी बियाणे लागवड

पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी असल्याने प्रत्येक नागरीकांनी दरवर्षी जास्तीत जास्त वृक्ष व बि बियाणे लागवड केली पाहीजे, असा संदेश समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक ऍड. जनार्दन टावरे यांनी दिला, रविवारी मुरबाड तालुक्यातील जंगल परीसरात नैसर्गिक साधन संपत्तीत वाढ होण्यासाठी तसेच निसर्गाचे संवर्धन व जतन करण्याचे सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याची जाणीव ठेवून समन्वय प्रतिष्ठान तर्फे आंबा, जांभूळ, चिक्कू, मवदूरे, आदी फळांच्या बि बियाणे आणि वृक्ष लागवड केली. प्रत्येकाने दरवर्षी एक तरी वृक्षाची लागवड केल्यास पर्यावरणात चांगला बदल होईल आणि प्रदुषणामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यावर उपाय योजना म्हणून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड करणेबाबत आवाहन केले. याप्रसंगी समन्वय प्रतिष्ठानचे सदस्य संतोष खेताडे, नितिन सावंत, किरण शिरसाठ, मंगेश मोहन्ट, मंगेश टेंबे, सुहास मोहन्ट, गुरुनाथ भोईर, शंकर पाटील, प्रदीप आवारे आदी उपस्थित होते.

Scroll to Top