शहरातील व-हाळदेवी मंदिराशेजारी असलेल्या वहाळदेवी नगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. मागील मे महिन्यापासून या भागात दूषित आरोप स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा होत असल्याचा केला आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने नागरिकांच्या पाण्याच्या समस्येकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे डाइंग सायजिंगला याच भागातून पाणी पुरवठा होत असतो त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र दूषित पाण्याने एखादी दुर्घटना घडली असता त्यास जबाबदार कोण असा सवाल येथील स्थानिक नागरिक ऍड. मुकेश नवगिरे यांनी व्यक्त केला आहे


