डोईफोडी नदीला पूर आल्याने दुर्गापुर रस्ता खचला

मुरबाड – तालुक्यात सातत्याने पाऊस पडत असून धसई जवळील डोहीफोडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दुर्गापुर गावचा रस्ता खचला असून धसई बाजारपेठेची गावाचा संपर्क तुटला असून येथे मोठा अपघात होऊ शकतो अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत. तसेच चासोळे ते वाकलवाडी खुठल रस्त्यावर मोठे झाड पडले असून
तब्बल दोन दिवस उलटूनही अजून वाहतूक बंद असून याकडे प्रशासन लक्ष देईल का असा सवाल नागरिक करत असून या रस्त्यावरून वाहतूकी वर मोठ्या परिणाम झाला असून वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Scroll to Top