भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वितरण व आरोग्य तपासणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून भिवंडीत ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह, क्षयरोग, रक्तदाब, सर्वसामान्य तपासणी व छातीचा एक्स-रे अशी विविध प्रकारची वैद्यकीय सेवा व आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात आली.

कार्यक्रमात सुमारे २०० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात जिल्हा सहसंपर्कप्रमुख मनोज गगे, माजी शहर प्रमुख मोहन वल्लाल, माजी जिल्हा संघटिका वैशाली मेस्त्री, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, माजी महानगर प्रमुख अरुण पाटील, पश्चिम सचिव नितेश दांडेकर, उपशहर प्रमुख गणेश मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांनी शिवसेनेच्या उपक्रमाबाबत आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजक गणेश मोरे, नितेश दांडेकर, मोहन वल्लाल व अरुण पाटील यांनी केले होते.

Scroll to Top