गेल्या सव्वा महिन्यात वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ठाणे शहरात तब्बल ६०० झाडे कोसळली. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेटी देत झाडांबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र वर्षभर मेट्रो, रिंग रेल्वे, सिमेंट-काँक्रीट रस्ते, गृहसंकुले आणि इतर विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रौढ वृक्षतोडीवर हीच मंडळी शांत का राहतात, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत.
२०२२ च्या वृक्षगणनेनुसार ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ७ लाख २२ हजार मोठी झाडे होती. शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढते काँक्रीटीकरण आणि विविध विकासकामांमुळे या संख्येत घट झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक दशकांपासून उभे असलेले छायादार वृक्ष विकासाच्या नावाखाली तोडले जात असताना त्याची पर्यावरणीय भरपाई कितपत झाली, याबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध नाही.
दरवर्षी वनमहोत्सव आणि वृक्षारोपण मोहिमांमध्ये लाखो रोपे लावल्याचे दावे केले जातात. मात्र शेकडो प्रौढ वृक्षांच्या बदल्यात केवळ रोपे लावून पर्यावरणीय नुकसान भरून निघत नाही. एका मोठ्या वृक्षाने निर्माण केलेले पर्यावरणीय संतुलन पुन्हा निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, भूजल पुनर्भरणात घट, पावसाचे पाणी झपाट्याने वाहून जाणे आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम ही हरित क्षेत्र कमी होत असल्याची गंभीर चिन्हे आहेत. विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाचा बळी देणारा विकास भविष्यात शहरालाच महागात पडू शकतो, असे मत पर्यावरण अभ्यासककेलेले पर्यावरणीय संतुलन पुन्हा निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, भूजल पुनर्भरणात घट, पावसाचे पाणी झपाट्याने वाहून जाणे आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम ही हरित क्षेत्र कमी होत असल्याची गंभीर चिन्हे आहेत. विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाचा बळी देणारा विकास भविष्यात शहरालाच महागात पडू शकतो, असे मत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केले.
झाडे कोसळल्यानंतर पाहणी करणे आणि सहानुभूती व्यक्त करणे सोपे आहे; मात्र अनावश्यक वृक्षतोड रोखणे, प्रत्येक विकास प्रकल्पात पर्यावरणीय नुकसान कमी करणे आणि भरपाई वृक्षारोपणाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली ठाणे हळूहळू काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित होण्यासाठी वेळ लागणार नाही.


