भिवंडीत एकमजली घराचा सज्जा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

भिवंडीत पावसाळ्यात धोकादायक घरांच्या पडझडीचे घटना नेहमीच घडत असताना शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शहरातील खंडुपाडा परिसरातील अन्सार मोहल्ला या भागात एक मजली लोड बेरिंग घरचा सज्जा कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असून एक जण किरकोळ जखमी झाली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार अन्सार मोहल्ला येथील १४४/५/१/जी १ हे कलीम अन्सारी यांचे घर असून तळमजल्यावर किरण दुकान तर पहिल्या मजल्या वर कलीम अन्सारी पत्नी व तीन मुलांसह राहत होते. सकाळी आठ वाजताच्या सुमारास या घराचा पुढील भागावरील तळमजल्यावरील सज्जा हा कोसळला ज्या मुळे पहिल्या मजल्यावरील पत्रे व भिंती यांची पडझड झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रभाग समिती क्रमांक एक चे सहाय्यक आयुक्त मक्सुम शेख हे अग्निशामक दल व आपत्कालीन कक्षातील पथक घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तातडीने या ठिकाणी असलेला राबिट उचलण्यास स्थानिकांच्या मदतीने सुरवात केली. घटनास्थळी उपायुक्त सपना वसावा यांनी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त घरालगतच्या घर रिकामी करून घेण्यास सांगत येथील धोकादायक घरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Scroll to Top