बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आगामी ५७ व्या बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त कर्मचारी कल्याणाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित करत बँक ऑफ इंडियाऑफिसर्स असोसिएशन (BOIOA) तर्फे मुंबई येथील बँक ऑफ इंडिया मुख्यालयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांच्यासहकार्याने सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये बोन मिनरल डेन्सिटी, ऑडिओमेट्री, ईएनटी, युरोफ्लोमेट्री, अस्थिरोग, वेदना व्यवस्थापन, आहारतज्ज्ञ मार्गदर्शन यांसहविविध विशेष वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे ६३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा
उत्स्फूर्त लाभ घेतला. या शिबिराचे उ‌द्घाटन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक वमुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांच्या हस्ते झाले.

यावेळी कार्यकारी संचालक श्री. राजगोपाल, सुब्रत कुमार, राजीव मिश्रा व प्रमोद द्विवेदी, तसेच मुख्य दक्षता अधिकारी (CVO) ललित तनेजा, बँकेचे अनेक मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापकआणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम BOIOA चे अध्यक्ष अँटोन सल्डान्हा आणि सरचिटणीस निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. कर्मचारी आरोग्य व सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देण्याच्या असोसिएशनच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे हे द्योतक असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक रजनीश कर्नाटक यांनी ऑफिसर्स असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. विशेषतः सरचिटणीस निलेश पवार यांनी अधिकारी हित डोळ्यासमोर ठेवून या आरोग्य शिबिराची केलेली संकल्पना व त्यासाठी घेतलेले परिश्रम यांचेत्यांनी विशेष अभिनंदन केले. उत्तम आरोग्य हे वैयक्तिक आनंदाबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचेही द्योतक असल्याचे सांगत प्रत्येक अधिकाऱ्याने स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

Scroll to Top