डोकेदुखी ठरलेल्या ‘त्या’ सहा मसाला गिरण्या अखेर बंद

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश

महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत सहा मसाला गिरण्या अखेर बंद झाल्याने येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. याबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिका स्तरावर पाठपुरावा करताना अधिवेशनातही आवाज उठवला होता.

भाजपच्या खोपट येथे झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या ११२व्या कार्यक्रमात संबंधित व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांचे आभार मानले.

महात्मा फुले भाजी मंडईत सुमारे ५०० गाळेधारक आहेत. या मंडईत अनधिकृतपणे सहा मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्या. यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी श्री. केळकर यांच्याकडे धाव घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. श्री. केळकर यांनी महापालिका स्तरावर अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी त्या गिरण्या बंद करण्याचे आदेश दिले. या गिरण्या बंद होऊन पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी आणि नागरिकांनी मुख्यालयासमोर
आंदोलनही केले होते. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात श्री. केळकर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून या मसाला गिरण्या बंद करण्यात आल्या. यामुळे व्यापारी आणि रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून त्यांनी श्री. केळकर यांचे आभार मानले. या कार्यक्रमात शर्थभंगाचे प्रकरण मार्गी लावल्याबद्दल कळवा येथील

Scroll to Top