केंद्र सरकारच्या निषेधार्थ अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर घोषणाबाजी

अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार २० जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील येथे घोषणाबाजी करून सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

दिल्ली येथील जंतर मंतरला होत असलेल्या आंदोलनाची धगधगता आणखी वाढेल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा नाही दिला, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा विश्वास राष्ट्रवादी प्रदेशचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ पाटील, वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख, अंबरनाथ शहराध्यक्ष सलीम खान, कैलाशी केंद्रे, मनीषा पोळ, आरपीआय खरात गटाचे राजाराम खरात, अशोक गजरमल, नागेश बरे, दिनकर पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील, श्रीमलंगगड विभाग प्रमुख प्रभाकर पाटील, हरिश्चंद्र पाटील, यशवंत पाटील, कैलास केंद्रे, विजय काठवडे, प्रल्हाद पाटील, जिल्हा सचिव राजेश वानखेडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top