ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणींचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते सन्मान

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सन्मानित केले. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, संजय भोईर, नगरसेविका मीनल संख्ये उपस्थित होते.

या निवडणुकीत विजयी झालेले ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलीक, सरचिटणीस राजीव डाके, सहचिटणीस प्रसाद सकट, खजिनदार राजेश शेटकर, कार्यकारिणी सदस्य निकेश शार्दुल, गजानन हरिमकर, सचिन देशमाने, अमर राजभर, प्रफुल्ल गांगुर्डे, नितिन दूधसागर, कार्यकारिणी सदस्य (महिला) सारिका साळुंखे यांचा सन्मान महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापौर दालनात करण्यात आला.

Scroll to Top