पारमिता धर्मादाय न्यासाच्या वतीने मोफत शालेय साहित्याचे वाटप

पारमिता धर्मादाय न्यास या शैक्षणिक, सामाजिक, बहुउद्देशीय, विकासाची कामे करणारी धर्मादाय संस्था कल्याण (प.) या संस्थेच्या वतीने, सोमवारी जागृती मंडळ द्वारा संचलित नालंदा विद्यालय कल्याण पुर्व येथील १ली ते ७वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारमिता धर्मादाय न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, सचिव मधुसूदन राऊत, खजिनदार अॅड. अनिल मेश्राम, सदस्य विश्वनाथ जांभूळकर तसेच जागृती मंडळाचे उपाध्यक्ष परमेश्वर माटे, सचिव अनिल जांभूळकर, सदस्य थुल, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

Scroll to Top