विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला निषेध

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जवाबदार असून त्यांनी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत आपली मागणी लावून धरली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्यासह जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रुपेश थळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, नरेश वायले, अनिल सावंत, निखिल कदम, वैभव माळी, संगीता मोरे, शिल्पा कांबळे, प्रेरणा तांबे, भानुदास घुगे, स्वप्निल शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top