वासिंद – ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या डोळखांब येथील हनुमान धबधबा नदीपात्रात पुराचे पाणी वाढल्याने अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी तीन बचावले मात्र यामध्ये वाहून गेलेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडला असता दुसरा बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोधमोहीमेत दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला आहे.
शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील भागात (दि. २६ जुलै रोजी) दुपारी तीन -साडेतीनच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी चोंढे (बु.) जवळील घाटघर प्रकल्प लगतच्या असलेल्या हनुमान धबधब्यामधील नदी पात्रात कल्याण येथील पाच तरुण आंघोळीसाठी उतरले असता या आलेल्या अधिकच्या पाणी प्रवाहात (पुराच्या पाण्यात) वाहू लागले. परंतु यामधील तीन तरुण बाहेर निघाले मात्र यामध्ये बुडालेला तरुण आकाश देशमुख (२१) याचा तरुणाचा मृतदेह सापडला होता. मात्र बेपत्ता झालेल्या दिनेश मांडळकर (३४) या तरुणाची शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, या झालेल्या घटनेतबाबत ग्राम महसूल अधिकारी, साकुर्ली यांनी तहसिल कार्यालयात माहिती होती. तर आपत्ती व्यवस्थापन शहापूर, किन्हवली पोलिस प्रशासन व ग्रामस्थ जीवरक्षक टिम कडून शोधमोहीम सुरू असताना आज दि. (२७ जुलै) दुसऱ्या दिवशी बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती तहसिल विभागातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.


