सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक १९ विष्णुनगर नौपाडा येथे उत्साहात पार पडला.
यावेळी जेष्ठ शल्य विशारद डॉ. श्रीपाद बोडस व डॉक्टर अंजली बोडस, ज्येष्ठ समाजसेवक अंजली व वसंत केळकर, जागतिक मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष किशोर नारायण पवार, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व करिअर मार्गदर्शक चंद्रशेखर शिंपी सर, उद्योजक संजय सागळे, उद्योजक योगेश कदम, उद्योजक स्वप्निल पायगुडे, सुजित बारस्कर सरचिटणीस मराठा समाज सुधागड आदींसह सुधागड तालुक्यातील अनेक मान्यवरांची आणि विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संस्थेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून समाजसेवेचा वसा जपणारे डॉ. श्रीपाद बोडस यांना सुधागड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेले अनेक वर्षे संस्थेत कार्यरत राहून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमां मध्ये सहभागी होऊन संस्थेच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार सांभाळलेले ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण तेलंगे यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वसंत व अंजली केळकर दाम्पत्य, चंद्रशेखर शिंपी व प्राध्यापक भावेश दिघे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी सुधागड रहिवासी एमबीबीएस पदवी संपादन केलेली पाछापूर गावातील डॉक्टर साक्षी सचिन वारंगे व पिलोसरी गावातील तालुक्यातील पहिल्यांदाच एमपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेली सपना कांतीराम इंदुलकर तसेच वकिली, मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर क्षेत्रात पदवी परीक्षा संपादन केलेल्या आणि उज्वल यश मिळवलेल्या तरुणांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली केळकर यांनी सुंदर कवितेतून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर चंद्रशेखर शिंपी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुधागड तालुक्यातील व ठाणे शहरातील महाराष्ट्र विद्यालयातील पितृछत्र हरपलेले विद्यार्थी यांना संस्थेच्या वतीने विद्याथी दत्तक योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच पदवी परीक्षा, १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमात आर्थिक सहकार्य करणारे देणगीदार, हितचिंतकव सुधागड वासी यांचे सरचिटणीस राजू पातेरे यांनी आभार व्यक्त केले. संस्थेच्या वतीने देणगीदारांचेही सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे Mals यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सव वाटचालीबाबत उपस्थित त्यांना माहिती दिली.
ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, शिवाजी दळवी, गणपत डींगे, प्रवीण तेलंगे, सुरेश शिंदे, चंद्रकांत बेलोसे, सरचिटणीस राजू पातेरे, शिक्षण समिती प्रमुख अनिल सागळे, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, अंतर्गत हिशोब तपासणीस दत्ता सागळे, चिटणीस अविकांत साळुंके, उपशिक्षण समिती प्रमुख श्याम बागडे, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, उपक्रिडा समिती प्रमुख जय गणेश दळवी, उपसंस्कृतिक प्रमुख रघुनाथ इंदुलकर, संपर्कप्रमुख सुनील तिडके, आरोग्य समिती प्रमुख राजेश बामणे, प्रसिद्धी प्रमुख अजय जाधव, सहाय्यक सदस्य भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, गजानन जंगम, मोहन भोईर, दत्ता दळवी, बबन चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी वैशाली खेरटकर, प्रमिला लहाने, सुलोचना जाधव, शर्मिला काळभोर, शुभांगी शिंदे, माधुरी भोईर, दर्शना जाधव, कविता तेलंगे आणि सुधागड तालुक्यातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


