क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती ठाणे जिल्हा परिषद येथे साजरी

स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. ३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद ठाणेच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहिली. त्यांच्या राष्ट्रप्रेम, लोकहितवादी विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि स्वातंत्र्यलढ्यातील धाडसी कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित आणि लोककल्याणासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top