मुरबाड – बदलापूर मार्गावरील अपघाताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, ४० प्रवासी सुखरूप

मुरबाड तालुक्यात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मुरबाड-कल्याण मार्ग तसेच माळशेज घाट परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांगले रस्ते उपलब्ध असूनही बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास मुरबाडहून बदलापूरकडे निघालेल्या एसटी बसचा बिरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या बदलापूर-मुरबाड एसटी बससोबत अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बस एकमेकांना घासून गेल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला वळवली. त्यावेळी बस एका झाडाला अडकल्यामुळे ती खोल बाजूला जाण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला.

या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Scroll to Top